कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, खडगपूरचे भाजप आमदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेते हिरण चटर्जी मोठ्या वादात सापडले आहेत. घटस्फोट न घेता प्रसिद्ध मॉडेल रितिका गिरी हिच्याशी वाराणसीत दुसरा विवाह केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला आहे.
वाराणसीत विवाहाचे फोटो व्हायरल
हिरण चटर्जी आणि रितिका गिरी यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. वाराणसीतील गंगा घाटावर हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह सोहळा पार पडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोंमुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या पत्नीची पोलिसांत तक्रार
विवाहाचे फोटो समोर येताच हिरण चटर्जी यांची पहिली पत्नी अनिंदिता चटर्जी यांनी आनंदपूर पोलीस ठाण्यात हिरण चटर्जी आणि रितिका गिरी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली. अनिंदिता यांचा आरोप आहे की, कायदेशीर घटस्फोट न घेताच हिरण चटर्जी यांनी दुसरे लग्न केले असून, हा विवाह कायद्याने अवैध आहे.
“आमचा विवाह ११ डिसेंबर २००० रोजी झाला असून आम्हाला १९ वर्षांची मुलगी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा मानसिक छळ झाला, मात्र मुलीच्या भविष्यासाठी मी शांत राहिले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच रितिका गिरी ही त्यांच्या मुलीपेक्षा केवळ दोन वर्षांनी मोठी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
‘विवाह लपवलेला नाही’ – रितिका गिरी
दरम्यान, रितिका गिरी हिने या विवाहाचे समर्थन केले आहे.“आमचा विवाह वाराणसीत पवित्र अग्नीच्या साक्षीने झाला आहे. याची माहिती अनिंदिता यांना आधीपासून होती. आम्ही काहीही लपवलेले नाही, आमची सोशल मीडिया खाती सार्वजनिक आहेत,” असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.वाद वाढल्यानंतर हिरण चटर्जी यांनी सोशल मीडियावरून विवाहाचे फोटो हटवले आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदारावर ओढवलेल्या या वादामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, तक्रारीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…