महाराष्ट्र

चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजपाचा घोडेबाजार; शिवसेना भूमिकेचे पडसाद राज्यात उमटणार

मुंबई: चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून अवघ्या एका मताने विजय मिळवला असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीतील घटक पक्ष असूनही काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला नाही, उलट भाजपाला अप्रत्यक्ष मदत झाली, असा आरोप त्यांनी केला.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसकडे ३१ नगरसेवक असताना शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा दिला, तर एमआयएमने तटस्थ भूमिका घेत भाजपाचा मार्ग मोकळा केला. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिल्यामुळे भाजपाचा उमेदवार केवळ एका मताने विजयी झाला.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा आणि एमआयएम यांची अदृश्य युती पुन्हा एकदा उघड झाली आहे. अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूरनंतर आता चंद्रपुरातही हे स्पष्ट झाले आहे. तटस्थ राहून एमआयएमने भाजपाला मदत केली असून भाजपा व एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा घणाघात त्यांनी केला.

काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांनी साथ दिली असती तर चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर झाला असता, असेही सपकाळ म्हणाले. महापौरपदासाठी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले असून पक्षात कोणतीही फूट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चंद्रपूर महापौर निवडणुकीबाबत निरीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात येणार असून त्यानंतर पक्षात सखोल चर्चा केली जाईल, अशी माहितीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसेच, “चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने घेतलेल्या भूमिकेचे परिणाम राज्याच्या राजकारणात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. परभणीत काँग्रेसनेही अशीच भूमिका घ्यायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

55 मिनिटे ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

8 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago