मनोरंजन

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतची धडाकेबाज वाईल्ड कार्ड एंट्री, घरात गोंधळाची सुरुवात

मुंबई: बिग बॉस मराठी ६ मध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. यंदाच्या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली असून, ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने थेट बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी राखीने आपल्या खास स्टाईलमध्ये घरात खळबळ उडवली असून, पुढील एपिसोड्समध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळणार, हे नक्की आहे.

बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये राखी सावंतच्या एंट्रीनंतर घरात नेमकं काय घडतंय, याची झलक पाहायला मिळते. प्रोमोच्या सुरुवातीलाच सागर कारंडे राखीला विचारतो, “राखी, तू कोणती ड्युटी करणार आहेस ते सांगितलं नाहीस.” यावर राखी नेहमीप्रमाणे मिश्कील उत्तर देत म्हणते, “मी फक्त दोनच ड्युटी करणार – जेवायची आणि झोपायची!”

यानंतर अनुश्री राखीला जेवण बनवायला सांगते. मात्र त्यावर “मला शिकवू नका,” असं ठाम उत्तर देत राखी सावंत पुन्हा एकदा आपल्या बेधडक स्वभावाचं दर्शन घडवते. पुढे राखी म्हणते, “आता मी जशी सती सावित्री आहे, तशी उद्यापासून गांधारी होणार आहे. एकेकाला बाहेर काढेन मी,” या डायलॉगने संपूर्ण घरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतं.

दरम्यान, बिग बॉस मराठी ६ चा मागील आठवडा अत्यंत धक्कादायक ठरला होता. घरातील सदस्यांना धमकी दिल्याच्या आरोपामुळे बिग बॉसने दिव्या शिंदेला थेट घराबाहेर काढलं. या निर्णयाने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर वीकेंडच्या एपिसोडमध्ये ओमकार राऊत एलिमिनेट झाला. एकाच आठवड्यात दोन स्पर्धक बाहेर गेल्यानंतर रविवारी राखी सावंतची वाईल्ड कार्ड एंट्री झाली.हा प्रोमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“आता येणार खरी मजा”, “राखी सावंत रॉक्स”, “घरात कल्ला होणार 100%”, “राखीचा नाद करू नका”, “आता सगळ्यांचा घमंड मोडणार” अशा अनेक कमेंट्स व्हायरल होत आहेत. काहींनी तर “आता बिग बॉस मराठी फॅमिली शो वाटणार नाही,” असंही म्हटलं आहे.राखी सावंतच्या एंट्रीनंतर घरातील सर्व सदस्यांचे धाबे दणाणले असून, आता बिग बॉसच्या घरात पुढे कोणते नवे वाद, ड्रामा आणि ट्विस्ट पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago