महाराष्ट्र

राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्राचा 2026-27 चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शेती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण यांना प्राधान्य देत “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सरनाईक म्हणाले की, राज्यातील रस्ते, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार, दळणवळण सुलभ करण्यासाठी विविध पायाभूत प्रकल्पांची घोषणा आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देणारे निर्णय राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील.

तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम आणि उद्योग-स्टार्टअप क्षेत्राला मिळणारे प्रोत्साहन यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“हा अर्थसंकल्प केवळ खर्चाचा नाही तर भविष्यातील विकासाची गुंतवणूक आहे. राज्यातील सर्व घटकांचा विचार करून सादर करण्यात आलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प महाराष्ट्राला प्रगत आणि सक्षम बनविण्यास निश्चितच मदत करेल,” असेही प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

2 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

5 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

5 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

22 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

1 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

1 दिवस ago