महाराष्ट्र

प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, म्हणूनच दररोज शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे आहे, असा टोला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. उबाठा गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शेकडो समर्थकांसह आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या पक्ष प्रवेश सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, आमदार किशोर पाटील आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उन्मेष पाटील यांच्यासोबत आज पंचायत समितीचे माजी सभापती, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपचे माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, भाजपचे माजी नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक चिरागउद्दीन शेख, माजी नगरसेवक गणेश महाले, दिपक देशमुख, सुबोध वाघमारे, गवळी समाजाचे प्रमुख विजू गवळी, ओबीसी समाजाचे संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहीत खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनिता पवार, रत्ना पाटील यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. महाराज म्हणायचे की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. आज राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना सुरु केली. विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी केला. निवडणुकीवेळी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आज महायुती सरकारने पूर्ण केले. जे बोलतो ते करुन दाखवणारी शिवसेना आहे. अडीच वर्षात केलेल्या कामामुळे इतिहासात पहिल्यांदा महायुतीचे २३२ आमदार निवडून आले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांवर हा पक्ष पुढे जातोय. त्यामुळेच सोलापूरमधील एका गरिब घरातील लाडक्या बहिणीला पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही आणि नोकर नाही, आपण सगळे सहकारी आहोत. आपत्ती तिथं शिवसेना, संकट तिथं शिवसेना या उद्देशाने पक्ष काम करतो. पहलगाम हल्ल्यावेळी महाराष्ट्रातील लोकांना सुरक्षित आणले. आताही इराण आणि अमेरिका युद्धामुळे दुबई अडकलेल्या शेकडो भारतीयांना दोन विशेष विमानाने मायदेशी आणले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आज नारपार योजनेसाठी ७००० कोटींची तरतूद केली आहे. चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक गायगोठे देणारे, जत्रा शासकीय योजनांची राबवणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करणारे, गिरणा परिक्रमा करणारे उन्मेष पाटील आहेत. खान्देशात शिवसेना घराघरात पोहोचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उन्मेष पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना केले. यावेळी माजी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री दरे गावी शेतात रमतात तेव्हा राज्यातील शेतकऱ्याला विश्वास वाटतो की एक नेता शेतीमातीत रमतो आणि आपले दु:ख समजून घेतो. मी सरदार होण्यासाठी नाही तर सैनिक म्हणून काम करण्यासाठी आलोय, अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

16 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

16 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

16 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

16 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

21 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

22 तास ago