पुणे: आग्रा दक्षिण बायपासवरील रायभा टोल प्लाझा येथे भाजप आमदाराच्या मुलाने टोल कर्मचाऱ्याला थप्पड मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. फास्टॅग नसल्यामुळे टोल कर्मचाऱ्याने कार अडवून शुल्क मागितल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी बाबूलाल यांचा मुलगा दुपारी सुमारे १२ वाजता टोल नाक्यावरून जात असताना कर्मचाऱ्यांनी टोल भरण्यास सांगितले. “गाडी का रोखली? पैसे का मागितले?” असा सवाल करत आमदारपुत्राने संताप व्यक्त केला. शाब्दिक चकमकीचे रूपांतर वादात झाले आणि संतापाच्या भरात त्याने कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
कारमध्ये असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने मध्यस्थी करत हा वाद शांत केला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “कर्मचारी आपले काम करत होता, त्याला मारहाण करण्याची गरज नव्हती,” असा सूर अनेकांकडून उमटत आहे.
दरम्यान, आमदार चौधरी बाबूलाल यांनी टोल कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, सुरेश चौधरी कोल्ड स्टोरेज सुविधेतून किरावलीकडे परतत असताना टोल कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले आणि गाडी आमदारांची असल्याचे ओळखूनही उद्धटपणा केला, त्यामुळे वाद वाढला.या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…