महाराष्ट्र

ग्रामीण भागातील PMPML ची बससेवा होणार पूर्ववत

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षांना सूचना

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्यामुळे सदर बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी PMPML चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असल्याने सदर बससेवा पुन्हा सुरु होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना PMPML प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा देखील सुरु झाली. त्यामुळे महामंडळाने PMPML प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय PMPML प्रशासनाने घेतला होता.

सध्या ग्रामीण भागातील 11 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेत नुकतेच अजून 12 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, PMPML प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत असताना मात्र ग्रामीण भागातील नागरिकांसह शाळकरी मुलांचे हाल होत असल्याने PMPML ची बससेवा सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन PMPML चे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पुन्हा बससेवा सुरु होणार असल्याने नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना दिलासा मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

2 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago