क्राईम

जमिनीच्या वादातून चुलता पुतण्यामध्ये हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वाटपाच्या वादातून चुलता पुतण्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून यावेळी पुतण्याने चक्क चुलत्याचा दात पाडला असून दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय बाळासाहेब भुजबळ व काळूराम विठ्ठल भुजबळ या दोघांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील बाळासाहेब भुजबळ, विठ्ठल भुजबळ, मोहन भुजबळ यांच्या जमिनीचे वाटपपत्र करण्याचे काम सुरु असताना विठ्ठल भुजबळ त्यासाठी सह्या करण्यात तयार नाहीत मात्र विठ्ठल भुजबळ यांनी सदर जागेमध्ये दुकान चालू केलेले असून त्याबाबत विचारणा करण्यासाठी बाळासाहेब यांचा मुलगा विजय गेला असता दोघांमध्ये वादावादी झाली त्यावेळी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली असून यावेळी विठ्ठल यांनी विजय यास चावा घेतल्याचे तर विजय याने विठ्ठलयांचा दात पाडल्याचे विठ्ठल यांनी म्हटले आहे.

याबाबत विजय बाळासाहेब भुजबळ व काळूराम विठ्ठल भुजबळ दोघे रा. नरेश्वर रोड सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरननाथ मुत्तनवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

10 तास ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

10 तास ago

औषधांच्या वेळा पाळण्यापेक्षा जेवणाच्या वेळा पाळ्णं हे जास्त फायद्याच

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…

10 तास ago

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावून निवडणुका नकोत! विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…

11 तास ago

शिरूर नगरपरिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांची खुर्ची अविश्वास ठरावाने धोक्यात

२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…

18 तास ago

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुफान हाणामारी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…

18 तास ago