महाराष्ट्र

पुण्यात पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ५० हजारांची रोकड लंपास; स्वारगेट पोलिसांकडून चोरट्यांचा शोध

पुणे : कामानिमित्त पुण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील प्रवाशाच्या खिशातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. पीएमपीएल बसमध्ये चढत असताना ही चोरी झाल्याचा संशय असून, या घटनेमुळे गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अहमदपूर येथील रहिवासी असून, शनिवारी (८ ऑगस्ट) कामानिमित्त पुण्यात आले होते. स्वारगेट परिसरात आल्यानंतर पुढील प्रवासासाठी त्यांनी कात्रज ते लोहगाव मार्गावरील पीएमपीएल बस पकडली.

बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातून ५० हजार रुपयांची रोकड हातचलाखीने काढून घेतली, असा संशय आहे. काही वेळाने खिशाला हात लावल्यानंतर पैसे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात तसेच आजूबाजूला शोध घेतला; मात्र रोकड मिळाली नाही.

ऐन प्रवासात मोठी रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून बसस्थानक परिसरातील तसेच संबंधित पीएमपीएल बस मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्वारगेट पोलिसांकडून तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

5 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

6 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

6 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

6 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

6 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

7 तास ago