महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंना हटवू नका; परेश रावलांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी, म्हणाले- ‘त्यांचं संरक्षण करणं हे कर्तव्य’

मुंबई : आपल्या धडक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भेसळखोर, नियम मोडणारे आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे मुंढे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतानाच आता बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही त्यांच्या कामाचं समर्थन केलं आहे.

विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांची सध्याच्या पदावरून बदली किंवा अन्यत्र रवानगी करण्यात येऊ नये, अशी थेट मागणी परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रावल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांना टॅग करत मुंढे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

परेश रावलांची मुख्यमंत्र्यांना थेट विनंती

परेश रावल यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली. मुंढे यांची त्यांच्या विभागातून बदली किंवा अन्यत्र रवानगी होऊ नये आणि त्यांचं संरक्षण करणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्राधान्य आणि कर्तव्य असायला हवं, अशी विनंती त्यांनी केली.रावल यांच्या या पोस्टनंतर तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची तसेच त्यांच्या भविष्यातील नियुक्तीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

मुंढेंच्या कारवाईचा राज्यभर बोलबाला

मे २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न भेसळ आणि नियमभंगाविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे.

अन्नपदार्थांची तपासणी, भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई, बेकायदेशीर गुटख्याची जप्ती, तसेच हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी यावर विभागाकडून विशेष भर देण्यात आला आहे. मुंबईतील काही प्रसिद्ध हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली. याशिवाय उच्च न्यायालयाच्या कँटीनमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतरही कारवाई करण्यात आली.या धडक कारवाईमुळे तुकाराम मुंढे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.

शाळांमधील जंक फूडवरही कठोर भूमिका

मुंढे यांच्या कार्यकाळात शाळांच्या परिसरात विकल्या जाणाऱ्या जंक फूडबाबतही कठोर भूमिका घेण्यात आली. शाळांच्या ५० मीटर परिसरात हाय-फॅट, हाय-शुगर आणि हाय-सॉल्ट असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्री आणि जाहिरातींवर निर्बंध आणण्याच्या निर्णयामुळेही त्यांची चर्चा झाली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या या भूमिकेमुळे मुंढे यांच्याकडे कठोर आणि नियमांची अंमलबजावणी करणारा अधिकारी म्हणून पाहिलं जात आहे.

२१ वर्षांच्या कारकिर्दीत अनेकदा बदल्या

तुकाराम मुंढे हे आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत धडक निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत. सुमारे २१ वर्षांच्या सेवेत त्यांना अनेकदा बदल्यांना सामोरं जावं लागलं आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीची आणि कठोर निर्णयांची चर्चा झाली.

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागातील त्यांच्या कारवाईला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्यातच आता परेश रावल यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मुंढे यांना पदावर कायम ठेवण्याची मागणी केल्याने या मुद्द्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे.

परेश रावल यांच्या या पोस्टमुळे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईसोबतच त्यांच्या संभाव्य बदलीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. आता सरकार मुंढे यांच्या धडक कारवाईला पुढे कितपत पाठबळ देतं, याकडे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

4 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

6 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

6 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

6 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

6 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

6 तास ago