महाराष्ट्र

छ. संभाजीनगरमध्ये आता व्यवसाय परवाना बंधनकारक; परवाना नसेल तर दंडात्मक करवाई

संभाजीनगर: दुकान / व्यवसाय चालवता का तर मग लगेच परवाना घ्या! कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आदेशानुसार, आता प्रत्येक दुकान, कार्यालय, सेवा-उद्योग चालवणाऱ्यांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे.

परवाना नसल्यास काय होऊ शकते

व्यवसाय बंद करण्याची कारवाई

दंडात्मक कार्यवाही

कायदेशीर गुन्हा नोंद

कोणकोणाला परवाना आवश्यक आहे

किराणा, भाजीपाला, कपडे दुकान

मेडिकल, सायबर कॅफे, सलून

कार्यालये, सर्व्हिस सेंटर, हॉटेल्स

लघुउद्योग, वर्कशॉप, शोरूम्स

कोणताही व्यवसाय – लहान असो की मोठा

परवाना मिळवण्यासाठी काय करावे 

महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा किंवा संबंधित विभागाच्या कार्यालयात संपर्क करा

आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा

शुल्क ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जमा करा

तुमचा व्यवसाय कायदेशीरपणे नोंदवा

वेळेत शुल्क न भरल्यास

अतिरिक्त विलंब शुल्क आकारले जाईल

परवाना न घेतल्यास व्यवसायावर दंडात्मक कारवाई

महत्वाचे

सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता आणि नागरी सुविधा लक्षात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 313, 376, 377, 378 आणि 386 अंतर्गत दुकान परवाना / व्यवसाय परवाना घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago