महाराष्ट्र

छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थता; मुंबईत उपचारासाठी रवाना

मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने Apollo Hospitals येथे नेण्यात आले, जिथे सिटीस्कॅनसह प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. पुढील उपचारांसाठी त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे प्रस्थान केले आहे. या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गेल्या वर्षी हृदय शस्त्रक्रिया

भुजबळ यांच्यावर गेल्या वर्षाच्या अखेरीस मुंबईतील आशियाई हार्ट इन्स्टिटयूट येथे हृदय शस्त्रक्रिया पार पडली होती. ही शस्त्रक्रिया प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांता पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही काळ ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले होते. डॉक्टरांच्या परवानगीनंतरच त्यांनी पुन्हा मर्यादित प्रमाणात कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती.

याआधी 2024 मध्ये पुणे दौऱ्यावर असताना प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते पुन्हा सक्रिय राजकारणात परतले होते.

राजकीय पार्श्वभूमी आणि भूमिका

राज्यातील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून भुजबळ यांची ओळख आहे. ओबीसी चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजासाठी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही भुजबळ यांनी नुकतीच टीका केली होती. विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होतील, असा दावा रोहित पवारांनी केला होता. मात्र, “विलिनीकरणाबाबत आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती नाही,” असे सांगत भुजबळांनी या दाव्याला दुजोरा दिला नाही. “निर्णय आधीच ठरवले गेले आहेत का?” असा टोला देखील त्यांनी लगावला.सध्या भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना कार्यकर्ते करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago