मनोरंजन

‘बिग बॉस मराठी: ‘काटा गँग’मध्ये फूट? तन्वी-प्रभूच्या नात्यात दुरावा; राखीच्या वक्तव्याने घरात खळबळ

मुंबई: ‘बिग बॉस’ हा असा खेळ आहे, ज्यात क्षणाक्षणाला समीकरणे बदलतात. मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होते, तर शत्रूही कधी मित्र बनतात. त्यामुळेच या खेळात अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातही असाच एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

घरात सध्या तीन गट स्पष्टपणे दिसत असून त्यातील ‘काटा गँग’मध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि प्रभू शेळके यांचा समावेश आहे. सुरुवातीपासून प्रभू आणि तन्वी यांच्यातील भाऊ-बहीणसारखे नाते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. मात्र, आता याच नात्यात दुरावा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रोमोमध्ये काय दिसले?

कलर्स मराठी वाहिनीने नुकताच सोशल मीडियावर एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये किचन एरियात तन्वी, प्रभू, राखी आणि इतर सदस्य दिसत आहेत.

राखी सावंत प्रभूला म्हणताना दिसते, “तू इथे पदर पकडायला आला नाहीस. तू इथे स्पर्धक आहेस. स्वतःसाठी खेळ.” त्यावर तन्वी राखीवर नाराजी व्यक्त करताना दिसते. प्रभू म्हणतो, “एकही निर्णय घेतला जात नव्हता. मी एकटा काय करू?” या वक्तव्यानंतर तन्वीला राग येतो.

तन्वी स्पष्ट शब्दांत म्हणते, “तुला वाटत असेल की तू पदर पकडून असतोस, तर उद्यापासून माझा पदर पकडू नकोस.” यानंतर प्रभू रडताना दिसतो. राखी त्याला समजावत म्हणते, “तू तिला कॅप्टन बनवलं आहेस. तुझा वापर करतात.” पुढे तीही भावूक होत “सॉरी, मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही,” असे म्हणताना दिसते.हा प्रोमो शेअर करताना वाहिनीने “डॉन सोडणार का तन्वीची साथ?” अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. काहींनी राखीच्या खेळाचे कौतुक केले आहे. “राखी प्रत्येकाचे डोळे उघडत आहे”, “राखी काट्यात राहून काट्यांचा काटा काढते”, “राखी कोणाचीच नसते”, “तन्वीनं त्याचा प्यादा म्हणून वापर केला”, “कडक! राखी खूप छान खेळत आहे”, अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

पुढे काय?

दरम्यान, तन्वी नुकतीच घराची कॅप्टन बनली आहे. त्यामुळे तिच्या नेतृत्वाखाली ‘काटा गँग’ टिकणार का, की प्रभू वेगळी वाट धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या भागात घरातील समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

14 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago