चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचा आजपासून जल्लोष!

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील कलात्मकता, आशय-विषयांची विविधता आणि नव्या चित्रपट प्रवाहांचा उत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ‘चित्रपताका–२०२६’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाला रविवारपासून (दि. १५ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, नितीन सुपेकर दिग्दर्शित आणि अद्याप प्रदर्शित न झालेल्या ‘बंधू’ या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे.

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता रवींद्र नाट्यमंदिराच्या मुख्य सभागृहात उद्घाटन सोहळा होईल. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर सायंकाळी ६.३० वाजता ‘बंधू’ चित्रपटाचे प्रदर्शन होईल. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन भावांमधील प्रेम, संघर्ष, जिव्हाळा आणि त्याग यांचे भावस्पर्शी चित्रण करतो.

यंदा ‘चित्रपताका’ महोत्सवाचे दुसरे पर्व असून, चार दिवसांत तब्बल ३३ आशयघन चित्रपटांचे प्रदर्शन आणि १५ हून अधिक संवादसत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, चित्रपट निर्मितीतील आधुनिक तंत्रज्ञान, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, जाहिरात आणि वितरण अशा विविध विषयांवर या माध्यमातून विचारमंथन होणार आहे.

महोत्सवात सात परिसंवाद, चार विशेष मुलाखती आणि विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विशेष मुलाखती हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. अनुभवी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, तंत्रज्ञ आणि चित्रपट अभ्यासक यांच्यासोबत नवोदित चित्रपटकर्मींना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

चित्रपट रसिकांसह विद्यार्थी, अभ्यासक, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी हा महोत्सव महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. विविध शैलीतील चित्रपट, नव्या दिग्दर्शकांचे प्रयोग आणि प्रस्थापित चित्रपटकर्मींच्या कलाकृतींच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील कलात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक आशयाचे दर्शन घडणार आहे.

चित्रपट महोत्सवातून दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात!

‘चित्रपताका’ महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांकडून आकारण्यात येणारे चार दिवसांचे १०० रुपये नोंदणी शुल्क संपूर्णपणे दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांचा आनंद घेतानाच दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.

महोत्सवाच्या नोंदणीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले. अधिकाधिक चित्रपटप्रेमींनी या महोत्सवात सहभागी होऊन मराठी चित्रपटांचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महोत्सवाचे सविस्तर वेळापत्रक, चित्रपट प्रदर्शनाच्या वेळा आणि नोंदणीची माहिती www.chitrapataka.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणातील वाळूमाफियांचे इंस्टाग्राम स्टेटसद्वारे प्रशासनाला खुले आव्हान; पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह शिरूरच्या यंत्रणेचे नेमके चाललेय तरी काय?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपशाचा…

23 तास ago

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन…

1 दिवस ago

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

6 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 आठवडा ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 आठवडा ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 आठवडा ago