मुंबई: महाराष्ट्राची हवा तरुण उद्योजकांसाठी पूरक आहे, या मातीमध्ये अनेक रोजगार पिकवण्याचा कस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत उद्योग आणि रोजगाराचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शासन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तरुणांसाठी एक स्तुत्य उपक्रम घेऊन आली असून नुकत्याच पार पडलेल्या या उपक्रमाच्या कार्यक्रमाला मुंबईच्या डब्बेवाल्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मुंबईचा डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके आणि सहकारी यांनी ग्रँटरोड येथील संस्थेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा आणि उद्योजकता ह्या विषयांना अनुसरून ही संस्था महाराष्ट्राच्या तरुणांपर्यंत पोहचणार आहे. नेतृत्व कौशल्य आणि सामाजिक कार्यात आवड असणाऱ्या तरुण तरुणींना या संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत असून, त्याचा विस्तार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक ह्या जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे.
‘चला परिवर्तनाचे शिलेदार होऊया’ ह्या बोध वाक्याच्या प्रेरणेने महाराष्ट्रात उद्योग क्रांती घडवून आणता येईल असा विश्वास संस्थेच्या सभासदांचा आहे. या संस्थेचा विस्तार प्रचार आणि प्रसार माध्यमाद्वारे करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि प्रतिमेला कुठेही गालबोट लागेल, असे वक्तव्य किंवा कृती आपल्या हातून घडणार नाही ह्याची दक्षता घेण्याचे आश्वासन देखील या संस्थेने दिले आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…