शिरूर तालुका

तळेगाव ढमढेरे रस्त्याच्या कडेला धन दांडग्यांचे अतिक्रमण

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गावातील धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय लोकांनी अतिक्रम सुरु करत व्यावसायी गाळे बांधण्यास सुरवात केली असून गावातील काही नागरिकांनी याबाबत शासकीय कार्यालयात तक्रारी केल्या असताना देखील खुलेआम अतिक्रमण सुरुच असल्याने खळबळ उडाली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे न्हावरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर रस्त्याचे कडेला अतिक्रमण करत व्यवसायी गाळ्यांचे काम सुरु केले आहे, तर सदर कामांच्या ठिकाणी गावातील काही धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय व्यक्ती देखील बसून असतात.

परंतु येथे अतिक्रम झाल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊन अपघाते देखील वाढणार असल्याने काही नागरिकांनी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करत सदर अतिक्रमण मधील बांधकाम थांबवण्याची मागणी केली आहे.

तहसीलदार कार्यालयाकडून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असताना देखील सध्याच्या शासकीय सुट्ट्यांमुळे सदर ठिकाणी काम जलद गतीने सुरु असून यावर काय कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपा पदाधिकारी चर्चेचा विषय…

तळेगाव ढमढेरे येथे अतिक्रमण करुन व्यावसायी गाळे बांधणाऱ्या व्यक्तींमध्ये एक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असून सत्तेद बदल झाल्यानंतर सदर पदाधिकाऱ्याने असे कृत्य सुरु केले असल्याने भाजपाचा पदाधिकारी चर्चेचा विषय बनला आहे.

तळेगाव ढमढेरे येथे काही गावातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे सुरु असलेले अनधिकृत काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत असून ग्रामपंचायत कार्यालयाचा काहीही संबंध नसून ग्रामपंचायत कार्यालयाने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिलेली असल्याचे ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago