औरंगाबाद: राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांचे नुकसानीमुळे विरोधी पक्षांसह राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु राज्य सरकारकडून अद्यापही औरंगाबाद जिल्ह्यात पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वायगाव येथील शेतकरी आपली दिवाळी चक्क स्मशानभुमीत साजरी केली आहे. सरकारने आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेली नाही, पंचनामे सुरू झाले नाहीत, नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांना कपडे आणि फटाके नाही.
त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ दिवाळी स्मशानभूमीतच साजरी करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…