महाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते…

मुंबई: गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे की नाही हे भाजपने पहिल्यांदा सांगावे आणि मान्य नसेल तर गोळवलकरांचे पुस्तक भाजपची अध्यात्मिक आघाडी जाळणार का हेदेखील सांगावे असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपने पुकारलेले आंदोलन एकदम चुकीचे आहे असेही महेश तपासे म्हणाले. भाजपला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहासच माहित नाही. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते त्यांनी १२० पेक्षा जास्त लढाया लढल्या व जिंकल्या त्या स्वराज्यासाठीच होत्या याची आठवणही महेश तपासे यांनी करुन दिली आहे.

गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे का असा संतप्त सवाल महेश तपासे यांनी केला आहे. राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते, मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली त्याचा निषेध विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. आज भाजप जे आंदोलन करत आहे ते दोगलं आहे आणि अजित पवार यांना जाणूनबुजून बदनाम करण्यासाठी आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यांना नरेंद्र पवार तुम्ही पाकिस्तानमध्ये पाठवणार का? अशी विचारणा करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताना मूग गिळून गप्प का होतात असा संतप्त सवालही महेश तपासे यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago