मुंबई: नाशिक हे श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच कुसुमाग्रज आणि सावरकरांच्या नावाने ओळखलं जायचं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेना ही नेहमी सक्रिय आहे. मनसेसुद्धा नाशिकमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असते. नाशिक हे धार्मिक पवित्र शहर आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं, नाशिक हे श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते.
तसेच कुसुमाग्रज आणि सावरकरांच्या नावाने ओळखलं जायचं. आज नाशिकमध्ये जी परिस्थिती आहे, त्याविरोधातही शिवसेनेने आंदोलन केले आहे. ड्रग्जच्या विरोधात सर्वात मोठा मोर्चा शिवसेनेने काढला होता. आज नाशिकमध्ये एक प्रकारचं अराजक सुरू आहे.
नाशिकच्या महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्यामुळे नाशिक शहराची संपूर्ण वाट लागली आहे. इथल्या लोकांना पाणी, रस्त्याच्या सुविधा नाहीत. नाशिकमध्ये गुंडगिरी सुरू आहे, नाशिकमध्ये ड्रग्ज विक्री सुरू आहे, तरुण व्यसनाधीन होत आहे. नाशिकमधले शेतकरी आत्महत्या करत आहेत.
आणि हे नाशिक शहर ज्या मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी दत्तक घेतले होते, त्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं आणि नाशिकची अवस्था पहावी. आम्ही त्यांना याबाबात वारंवार कळवलं, आंदोलन केले, रस्ता रोको केले. शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन विराट मोर्चा काढावा, आक्रोश मोर्चा काढावा असे ठरले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे. अभ्यंकर हे नाशिकमध्ये पोहोचले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…