महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या राज्यातील तीन शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

बीड जिल्ह्यातील दामुनाईकतांडा (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शिक्षक शशिकांत कुलथे, याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांनी वर्ष २०२२साठीचे हे पुरस्कार पटकावले आहे.

‘या शिक्षकांची कामगिरी राज्याच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव वाढविणारी आहे. या तिघांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आणि प्रोत्साहन ठरेल. यासाठी या सर्वांचा अभिमान आहे. तिघांचेही अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’ असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही…

6 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय…

15 तास ago

विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन शेळ्याही जागीच दगावल्या…

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची…

18 तास ago

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित निलेश खाबिया व अनिल बांडे यांचा सत्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जागतिक रक्त संक्रमणामध्ये रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…

एका रात्रीत केली तीन विद्युत रोहीत्रांची चोरी सविंदणे (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी…

2 दिवस ago

शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक…

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यातील अनेकजण महाराष्ट्र शासन, आमदार, पोलिस, प्रेस तसेच…

2 दिवस ago