सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे.
चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा आणि संगीत यांचे अद्वितीय संमीलन असते. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना ही जुनी व लुप्त होत चाललेली लोककला प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे.
“चित्रकथी म्हणजे आमच्या परंपरेचा आत्मा आहे. ही कला लोकांनी अनुभवावी, शिकावी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावी, हेच आमचं ध्येय आहे,” असे चेतन परशुराम गंगवणे म्हणाले. ते कार्यशाळेचे समन्वयक असून पद्मश्री परशुराम गंगवणे यांच्या वारशाचे जतन करणाऱ्या कुटुंबातील सदस्य आहेत. केवळ ₹१०० प्रवेश शुल्कात ही कार्यशाळा कोणालाही खुली असून, विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील जिज्ञासूंना सहभागी होता येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…
हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…
विजय वडेट्टीवारांचा घणाघात; जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक…
जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून…
अनेक जणांच्या डोक्यामध्ये नेहमीच खूप कोंडा असतो. हिवाळ्यात कोंड्याचे प्रमाण वाढते हे सहाजिक आहे. पण…