आरोग्य

अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढला, सतत चिडचिड करताय, पालकांनी आता करायचं काय

छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बऱ्याचदा दिसून येते. अनेक मुले, तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल, तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांना शांत करावे, त्यांच्यासोबत वेळ घालवावा.

हल्ली ऑनलाइन गेम्स, मोकळ्या वातावरणात आणि मित्रांसोबत बाहेर न खेळणे, मुलांचा प्रचंड प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाइम आणि टीव्ही मोबाइलवर पाहिल्या गेलेल्या घातक दृश्यांमुळे मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत आहे. सतत नकारात्मक गोष्टी बघणे, एकटे राहणे आदी कारणांमुळे मुले रागीट होतात.

लहान मुले अनुकरणातून व निरीक्षणातून शिकत असतात. त्यामुळे मुलांचा राग नियंत्रणात ठेवायचा असेल आणि चिडचिड कमी करायची असेल, तर घरातील ज्येष्ठांनी, पालकांनी आपली वागणूक कशी आहे, यावरही लक्ष केंद्रीत करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

आई-वडिलांचा वेळ गरजेचा: आई वडील मुलांना फारसा वेळ देत नसतील, तर मुले स्वतःला एकटे समजतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट आणि चिडचिडा होतो. मुलांना राग आला, तर त्यांची प्रेमाने समजूत घालायला हवी. लहान मुलांवर हात उगारणे, त्यांना चिडवणे टाळावे, मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे. याचेही भान पालकांनी ठेवणे आवश्यक आहे

मानसोपचारतज्ज्ञ काय सांगतात: घरातील वातावरणाचा मुलांवर प्रभाव पडतो. त्यामुळे हे वातावरण खेळीमेळीचे असावे, आई वडिलांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्याच्या रागामागील कारणांचा शोध घ्यावा. मुले मोबाइलवर काय बघतात, याकडे लक्ष द्यावे. अधिकच चिडचिडेपणा, राग येत असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार घ्यावा.

याकडे लक्ष द्या: मुलांच्या रागाला वाईट वर्तवणुकीचे लेबल लावू नका. त्यांना सतत व्यग्र ठेवा. मुलांच्या विविध उपक्रमांचे वेळापत्रक तयार करा. यामुळे गोष्टी स्थिर असल्यास त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. लहान मुले पालकांचं अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी स्वतःचे वेळोवेळी निरीक्षण करणे आवश्यक आहे. आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या काळात पालकांनी मुलांना संयमाचे महत्त्व शिकवणे गरजेचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

18 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago