महाराष्ट्र

वाचन चळवळ समृद्धीसाठी कटिबद्ध; मनपा ग्रंथालय शाखांच्या अनुदानवाढीसाठी सहकार्य करणार; महापौर रितू तावडे

मुंबई: मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांनी शनिवारी Mumbai Marathi Granth Sangrahalaya येथे आयोजित ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवा’ला भेट देत वाचन चळवळीच्या बळकटीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच मनपाच्या ग्रंथालय शाखांच्या अनुदानवाढीसाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या प्रसंगी त्यांच्या हस्ते मुंबईतील सार्वजनिक ग्रंथालयांमधील उत्कृष्ट अबालवृद्ध सभासदांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उपस्थित वाचकांशी संवाद साधताना महापौर तावडे म्हणाल्या की, “शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहून आनंद झाला. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ग्रंथसंग्रहालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”

दुर्मिळ ग्रंथांचे जतन व संवर्धन करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “ग्रंथसंपदा ही समाजाची बौद्धिक संपत्ती आहे. तिचे संरक्षण आणि समृद्धी आवश्यक आहे.” तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मनपा ग्रंथालय शाखांच्या अनुदानवाढीसाठी दिलेल्या प्रस्तावाला आपण कायम पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गिते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्याध्यक्ष शीतल करदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यानंतर महापौर तावडे यांनी ग्रंथसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला भेट देत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय’च्या स्टॉलवरून त्यांनी ‘भारताचे संविधान (सुधारित २०२५)’ हा ग्रंथ खरेदी केला. “हा ग्रंथ सर्व नगरसेवकांकडे असायला हवा,” अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

तसेच संदर्भ विभागात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. ग्रंथसंग्रहालयात सुरू असलेल्या डिजिटायझेशन (अंकीकरण) प्रकल्पाची पाहणी करून स्कॅनिंग प्रक्रियेची माहिती घेतली.या भेटीदरम्यान संदर्भ विभागाच्या ग्रंथपाल मिताली तरळ, कार्यवाह उमा नाबर, जयवंत गोलतकर, विनायक परब यांसह अनेक पदाधिकारी, सदस्य आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या धावत्या पण अभ्यासपूर्ण भेटीत महापौर रितू तावडे यांनी ग्रंथोत्सव व ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका; सतर्कताच आर्थिक फसवणुकीचा प्रभावी उपाय; कुमार कदम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असतानाच सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक,…

28 मिनिटे ago

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…

2 तास ago

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

3 तास ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

3 तास ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

3 तास ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

3 तास ago