नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले असून, या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांची भेट घेऊन या घटनेबाबत चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रातून सात प्रमुख मागण्या केल्या आहेत. शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तातडीने निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, तसेच हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध लागू कायद्यांनुसार तातडीने FIR दाखल करून पुराव्यांच्या आधारे कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच घटनेशी संबंधित CCTV फुटेज, व्हिडिओ, छायाचित्रे, मोबाईल रेकॉर्डिंग आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने जतन करून तपासात समाविष्ट करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शी आणि संबंधित व्यक्तींचे जबाब कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेत इतर व्यक्तींचा सहभाग, चिथावणी किंवा पूर्वनियोजन आढळल्यास संबंधितांवरही कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच तपासाची प्रगती आणि करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती तक्रारदार किंवा संबंधित पक्षाला नियमानुसार देण्यात यावी, असे वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, राज्यातील शांततापूर्ण आंदोलने आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
“आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांवर हल्ले होत असतील, तर हा लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका काँग्रेस शिष्टमंडळाने मांडली.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…