महाराष्ट्र

MHT-CET कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा; रोहित पवार

CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवेदन; विद्यार्थ्यांना न्यायाची मागणी

मुंबई: MHT-CET परीक्षेतील कथित अनियमितता आणि गैरप्रकारांच्या आरोपांची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिष्टमंडळाने CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शिष्टमंडळाने MHT-CET निकालांबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या शंका, काही परीक्षा केंद्रांबाबतचे आरोप, बारावी आणि CET गुणांतील संशयास्पद तफावत तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्सची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. संबंधित परीक्षा केंद्रांवरील CCTV फुटेज, संगणकीय लॉग्स, सर्व्हर डेटा आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवून तपास करण्याचीही मागणी करण्यात आली.

यावेळी आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत परीक्षा प्रक्रियेतील सर्व शंकांचे पारदर्शकपणे निरसन करण्याची मागणी केली. तर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी, “कथित गैरप्रकारांची वेळेत निष्पक्ष चौकशी झाली नाही आणि गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा दिला.

परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी आणि दलालांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

11 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago