मुंबई: भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजनाचा उत्सव नसून प्रेरणा देणाऱ्या, घडवणाऱ्या आणि संकटसमयी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. समाजजीवनाप्रमाणेच राजकारणातही काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांच्या नेतृत्वातून हजारो कार्यकर्ते घडतात, त्यांना दिशा मिळते आणि संघर्ष करण्याची ऊर्जा प्राप्त होते. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब हे असंख्य शिवसैनिकांसाठी असेच प्रेरणादायी गुरुतुल्य नेतृत्व आहेत.
संघर्षातून घडलेले नेतृत्वच काळाच्या कसोटीवर टिकते. सामान्य शिवसैनिक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचला, तो केवळ राजकीय योगायोग नव्हे; तर अथक परिश्रम, संघटननिष्ठा, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांवरील निस्सीम विश्वास यांचे फलित आहे. पद हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैभव नसून माणसे जोडण्याची कला, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची संवेदना आणि संकटसमयी खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती हेच त्यांच्या नेतृत्वाचे खरे सामर्थ्य आहे.
राजकारणात अनेक नेते भेटतात; मात्र प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारे नेतृत्व विरळाच असते. मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांनी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामान्य शिवसैनिकांना नेहमीच सन्मानाचे स्थान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव केला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि योग्य वेळी त्यांना बळ दिले. त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर हा केवळ पदामुळे नसून त्यांच्या माणुसकीमुळे आहे.
संघटना ही केवळ आदेशांनी चालत नाही, तर विश्वासाने उभी राहते. हा विश्वास निर्माण करण्यासाठी सातत्य, संयम आणि आत्मीयता आवश्यक असते. मा. शिंदे साहेबांनी आपल्या कार्यपद्धतीतून हा विश्वास जपला. गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत कार्यकर्त्यांना संधी देत, त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि नेतृत्व विकसित करत त्यांनी संघटनेला नवी ऊर्जा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक शिस्त आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास यांचा सुंदर समन्वय पाहायला मिळतो.
मुत्सद्दीपणा म्हणजे केवळ राजकीय समीकरणे नव्हेत, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता होय. कठीण प्रसंगात धैर्य, संकटात संयम आणि यशात नम्रता ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये आहेत. प्रशासनाचा अनुभव, विकासाची दूरदृष्टी आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया यांच्या बळावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र आणि प्रभावी राजकीय शैली निर्माण केली आहे.
आज तमाम शिवसैनिक आणि राज्यातील असंख्य भगिनी त्यांना प्रेमाने “लाडके भाऊ” म्हणून संबोधतात. या संबोधनात अधिकारापेक्षा आपुलकी अधिक आहे. गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, दुःखी कुटुंबांना दिलेला आधार आणि समाजातील वंचित घटकांबद्दलची संवेदनशीलता यामुळे अनेकांच्या मनात त्यांनी “लोकनाथ” म्हणून वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा प्रकारचा सन्मान कोणत्याही पदामुळे मिळत नाही; तो लोकांच्या प्रेमातून, विश्वासातून आणि सेवाभावातून प्राप्त होतो.
गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर असंख्य शिवसैनिक आपल्या राजकीय वाटचालीचे प्रेरणास्थान म्हणून मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहतात. त्यांच्या नेतृत्वातून संघटननिष्ठा, जनसेवेची तळमळ, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि संकटाशी दोन हात करण्याचे धैर्य शिकण्याची प्रेरणा मिळते. अशी प्रेरणा देणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने गुरुतुल्य ठरते.
आजच्या या शुभदिनी त्या नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक वंदन करत एकच प्रार्थना—
“आपल्या विचारांचा दीप अखंड तेवत राहो, आपल्या नेतृत्वातून कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळत राहो, महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळत राहो आणि जनसेवेचा हा अखंड यज्ञ अधिक तेजस्वी होत राहो.”
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांना विनम्र गुरुवंदन!
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…
टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही…