महाराष्ट्र

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

नाशिक येथील एमटीडीसी रिसॉर्टमध्ये होणाऱ्या या शिबिरात काँग्रेसची आगामी काळातील दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, पक्षाची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील काँग्रेसची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचे प्रश्न, अपेक्षा आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही प्रशिक्षणात विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

राज्य व देशपातळीवरील विविध क्षेत्रांतील मान्यवर अभ्यासक आणि तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय वॉर रूमचे प्रमुख खासदार शशिकांत सेंथिल तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत.

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील AICC प्रशिक्षण टीम या शिबिराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे.

‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा अभ्यास, जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, संघटनात्मक कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वक्षमता या बाबींवर प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे.

विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थींना दररोज श्रमदानात सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील वास्तव आणि जनतेच्या प्रश्नांची प्रत्यक्ष जाणीव व्हावी यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभवही दिला जाणार आहे. श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेत संघटनात्मक व राजकीय नेतृत्व अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणातून केला जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

3 तास ago

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…

8 तास ago

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…

10 तास ago

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

2 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

3 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago