मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ‘जेन-झी संवाद’ कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला देशभरातून मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपने त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला; मात्र फडणवीसांचा कार्यक्रम सुपरफ्लॉप ठरला, असा दावा सपकाळ यांनी केला.
राहुल गांधी तरुणाईशी सातत्याने संवाद साधत असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ‘छात्रों की गुंज’ हे व्यासपीठ उभे करण्यात आले आहे. पुण्यातील कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भाजपनेही अशाच प्रकारचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी त्याकडे पाठ फिरवली, असा आरोप सपकाळ यांनी केला.
“राहुल गांधी यांच्याप्रमाणे कार्यक्रम करू, असे ठरवून भाजपने सरकारी यंत्रणांचा वापर केला; मात्र जेन-झीने त्याकडे पाठ फिरवली. नक्कल करायलाही अक्कल लागते,” असा टोला सपकाळ यांनी लगावला.
राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरही सपकाळ यांनी निशाणा साधला. “राहुल गांधी यांना महिला विरोधी ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न खोटा आहे. महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेसने महत्त्वाचे निर्णय घेतले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला होता,” असे ते म्हणाले.
संसदेत २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले असून, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असा दावा करत सपकाळ यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. “स्वतः फडणवीसांनी महिला आरक्षणाबाबत आनंद व्यक्त करत ट्विट केले होते. मग आता कोणत्या महिला आरक्षणाबद्दल ते बोलत आहेत? खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा भाजपचा प्रयत्न जनता ओळखून आहे,” असे सपकाळ म्हणाले.
मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत. दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला…
सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं…
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिका रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी…
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की…
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…