महाराष्ट्र

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोप झाला. २४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या शिबिरात राज्यातील जिल्हाध्यक्षांना संघटनात्मक कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

राहुल गांधी यांचे बुधवारी सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शोभा बच्छाव, जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर राहुल गांधी यांनी एमटीडीसी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या ठिकाणी राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप, रेहाना चिश्ती आणि वामशी रेड्डी उपस्थित होते.

बैठकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यानंतर प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी जिल्हाध्यक्षांशी संवाद साधत संघटन मजबूत करण्याचा आणि काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहोचवण्याचा संदेश दिला.

विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती देत त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथून आलेल्या आंदोलनकारी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत काँग्रेस पक्ष त्यांच्या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

4 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

5 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

5 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

5 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

5 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

7 तास ago