४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार, बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी
मुंबई: राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आयोजित या रोजगार मेळाव्यात आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या माध्यमातून तरुणांना शेकडो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील इयत्ता ८ वी पासपासून उच्च शिक्षित गरीब व मध्यम वर्गीय तरुणांसाठी ही विशेष संधी आहे. बेरोजगार तरुणांनी https://forms.gle/1Y7mScKgSAc9tY1E8 या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी व या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…