महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. गणेशोत्सव काळात भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विधान भवन येथे आढावा बैठक घेतली.

या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे, विसर्जन स्थळांवरील सोयी-सुविधा, विद्युत व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा सचिन अहिर यांनी सविस्तर आढावा घेतला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने विसर्जन मार्गांवरील झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अहिर यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. तसेच विसर्जन घाटांवर पुरेशा प्रमाणात जीवरक्षक, प्रकाश व्यवस्था आणि प्रथमोपचार केंद्रे उपलब्ध ठेवण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या घेताना अडचणी येऊ नयेत, यासाठी ‘एक खिडकी योजना’ अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी सूचनाही अहिर यांनी केली. परवानग्यांची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गणेशोत्सव काळात नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेता पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने परस्पर समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. नागरिक आणि गणेशभक्तांना यंदाचा उत्सव अधिक उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात साजरा करता यावा, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन सचिन अहिर यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 मिनिटे ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

21 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

21 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

1 दिवस ago