महाराष्ट्र

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिंदे म्हणाले, “देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे.”

पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “देशाला प्रगतीपथावर नेणारे, भारताला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा ध्यास घेतलेले मोदी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. ‘देश प्रथम’ हीच त्यांची भूमिका आहे. अशा नेतृत्वावर अश्लाघ्य आरोप करणे ही काँग्रेसची खालची पातळी दाखवते,” असे ते म्हणाले.

काँग्रेसवर निशाणा साधताना शिंदे पुढे म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या काळातही काँग्रेसने पाकिस्तानची भाषा बोलत भारतीय जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. पंतप्रधानांनी ठोस कारवाई करून देशाच्या सन्मानासाठी उभे राहत शत्रूंना प्रत्युत्तर दिले, पण काँग्रेसला तेही पचले नाही.”

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा न देता ते अडवण्याचा प्रयत्न केला, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. “१४० कोटी जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरत काँग्रेसने महिलांच्या हक्कांनाच विरोध केला आहे. त्यामुळे देशातील महिला वर्गात काँग्रेसविरोधात तीव्र संताप निर्माण झाला असून, आगामी काळात महिलाच काँग्रेसला धडा शिकवतील,” असा घणाघात त्यांनी केला.

“महिलांच्या सन्मानासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक भूमिका घेणाऱ्या नेतृत्वावर टीका करणे म्हणजे देशद्रोहाच्या जवळ जाणारे वक्तव्य आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने देशविरोधी सूर लावतात. त्यामुळे तेच खरे राष्ट्रद्रोही असल्याचे जनतेसमोर उघड होत आहे,” असा घणाघातही शिंदे यांनी केला.काँग्रेसच्या राजकीय भविष्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“अशा संतापजनक वक्तव्यांमुळे काँग्रेस स्वतःचीच कबर खोदत आहे. १४० कोटी जनता मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी काळात विशेषतः महिला वर्ग काँग्रेसला धडा शिकवेल,” असा इशाराही त्यांनी दिला.“परदेशात जाऊन देशाची बदनामी करणे, पाकिस्तानची भाषा बोलणे आणि राष्ट्रीय हिताला धक्का पोहोचवणे हे काँग्रेसचे खरे चेहरे आहे,” असा आरोप करत शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

4 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

11 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

12 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago