मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. मंगळवारी (ता. २९) सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शंकर मुंजाळ आणि सबाजी भागा मुंजाळ (वय ३८, रा. मुंजाळवाडी, कवठेयमाई) हे दोघे रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी मारुती सुझुकी स्विफ्ट (एमएच ०४ एफझेड ७७७०) चालक वैभव ढोमे (रा. पिंपरखेड, ता. शिरूर) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून स्पीड ब्रेकरवर वेग कमी न करता दोघांना धडक दिली. या अपघातात संतोष मुंजाळ यांचा मृत्यू झाला, तर सबाजी मुंजाळ जखमी झाले. अपघातानंतर चालकाने जखमींना घटनास्थळी सोडून अपघाताची खबर न देता वाहनासह तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याबाबत पांडुरंग बबन मुंजाळ (वय ४९, व्यवसाय शेती, रा. मुंजाळवाडी, कवठेयमाई) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गु.र.नं. ८६३/२०२६ अन्वये बीएनएस कलम १०६(१), २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हवालदार गवळी (ब.नं. २२७१) यांनी केली. पोलिस उपनिरीक्षक राहुल भागवत पुढील तपास करीत आहेत.
शिरुर तालुक्यात अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; बँकेतील तरुण कॅशियरचा दुर्दैवी मृत्यू
न्हावरे-काष्टी अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी
मलठण-कवठे येमाई अष्टविनायक रस्त्यावर वाढले अपघाताचे प्रमाण; ऊस वाहतूक…
शिरुर! अष्टविनायक महामार्गावर सोने सांगवीजवळ अपघात…
Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…