महाराष्ट्र

भारत–अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेसचा एल्गार; ७ मार्चला यवतमाळात आंदोलन; विजय वडेट्टीवार

नागपूर: भारत–अमेरिका नव्या व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या कराराविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून ७ मार्च रोजी यवतमाळ येथे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिल्ली येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत भारत–अमेरिका व्यापार करार आणि त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर शून्य टक्के कर आणि भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर १० टक्के कर आकारला जाणार असल्यास हे धोरण अन्यायकारक ठरेल, असा दावा त्यांनी केला. या असमतोलामुळे महाराष्ट्रातील कापूस, मका, तूरडाळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत येतील, असे ते म्हणाले.

सध्या कापसाला सुमारे ४,५०० रुपये दर मिळत असून मक्याचा भाव केवळ १,५०० रुपयांवर आला आहे. सोयाबीनचे दरही घसरले आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यात अधिक रस दाखवत असल्याची टीका त्यांनी केली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणारे हे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिल्लीतील बैठक ही केवळ व्यापार करार आणि आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट करत चंद्रपूर प्रकरणात आपण कोणतीही चूक केलेली नसताना माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. काही हितशत्रू जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईतील मराठी शाळा बंद करून शहराचे ‘गुजरातीकरण’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राज्यात २२ हजार शाळा बंद पडल्या असून सुमारे ४ हजार शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. हे सरकार जाणीवपूर्वक शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे सांगत सिन्नर आणि बदलापूर येथील घटनांचा उल्लेख त्यांनी केला. मुली बेपत्ता होणे आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारने तातडीने विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर होते. राहुल गांधी कोणत्याही दबावाला घाबरणारे नाहीत. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राहुल गांधींची भीती वाटते, असा दावा करत कितीही खटले दाखल झाले तरी काँग्रेस सत्यासाठी लढत राहील, असे वडेट्टीवार म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago