महाराष्ट्र

संविधान हा लोकशाही मूल्यांचा पाया; डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेत संविधान गौरव चर्चा

मुंबई: भारतीय संविधान स्वीकारण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर विशेष चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक प्रवासावर, महिलांच्या योगदानावर आणि सध्याच्या परिस्थितीतील अंमलबजावणीवर सखोल विवेचन केले.

सभापती राम शिंदे यांनी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभागृहाने एकत्र येऊन या ऐतिहासिक घटनेचा सन्मान करावा, असे मत व्यक्त करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा दिला.

त्याला अनुमोदन देताना, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात संविधानाच्या निर्मितीचा विस्तृत प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, “अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती भारताला एक होण्यापासून परावृत्त करू शकत नाही,” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासमितीसमोर दि. १७ डिसेंबर १९४६ रोजी स्पष्ट केले होते.

त्या पुढे म्हणाल्या, “राज्यघटनेचा प्रवास हा अनेक विचारवंत, कायदेविषयक चर्चा आणि ऐतिहासिक घडामोडींनी समृद्ध आहे. १७७७ पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली सुरू झालेल्या बदलांपासून ते १९५० मध्ये लागू झालेल्या भारतीय संविधानापर्यंतची वाटचाल महत्त्वपूर्ण आहे.

संविधानाच्या निर्मितीत महिलांचा मोठा वाटा राहिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “राज्यघटना बनविणाऱ्या समितीत १५ कर्तृत्ववान महिलांनी योगदान दिले. त्यांनी स्त्रियांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आणि समाजाच्या सर्व स्तरांतील महिलांसाठीचे हक्क संरक्षित केले.

त्या पुढे म्हणाल्या, “आजच्या परिस्थितीत महिलांना अनेक कायद्यांद्वारे संरक्षण मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला, त्यामुळे स्त्रीशक्तीला अधिक बळ मिळाले. ‘नमो शक्ती वंदन विधेयक’ हे याचेच रूप आहे.”

संविधानातील समान नागरी कायद्याचा मुद्दा मांडताना त्या म्हणाल्या, “समान नागरी कायदा हा केवळ धार्मिक मुद्दा नसून, तो स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतात पूर्वी दायभागा आणि मिताली हे दोन वेगवेगळे कायदे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलद्वारे या दोन्ही कायद्यांचे संहितीकरण केले, ज्याला महाराष्ट्रातील पुरोगामी महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला.”

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील स्टँडअप कॉमेडी आणि सायबर क्राईम यासंदर्भात त्यांनी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, “सध्याच्या डिजिटल युगात चुकीची माहिती पसरवण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबरगुन्हे जामिनप्राप्त असल्याने महिलांना न्याय मिळतांना अडचणी येत आहेत . या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित उपाययोजना कराव्यात.”

त्या पुढे म्हणाल्या, “भारतीय संविधान केवळ कायदे नाहीत तर ती जीवनमूल्ये समज़ुन ती कुटुंबात आणि समाजातही रुजवणे आवश्यक आहे. नीलम गोर्हेंनी महिलांबाबत म्हणजे मानवी अधिकार कायदे व मानव अधिकार कायदे म्हणजे महिलांचे कायदे हे ही अधोरेखित केले .

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

17 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago