महाराष्ट्र

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, “‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग करून काँग्रेस स्वतःच आपल्या इतिहासालाच नाकारत आहे का?” असा सवाल उपस्थित केला.

उमेश पाटील म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात त्यांच्या राजकीय कारकिर्दीत विरोधकांनी याच शब्दप्रयोगाचा वापर केला होता. मात्र इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्या टीकेला उत्तर दिले. बांग्लादेश मुक्तिसंग्रामातील नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे त्या जागतिक स्तरावरील प्रभावी नेत्या ठरल्या, याची आठवणही त्यांनी करून दिली.

“ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळात महिलांचा अवमान मानले होते, त्याच शब्दांचा वापर आज एका महिला लोकप्रतिनिधीविरोधात का केला जात आहे? याचा अर्थ काँग्रेस त्या काळातील टीका योग्य होती, असे मानत आहे का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभणारी नाही. लोकशाहीत मतभेद आणि धोरणांवर टीका होऊ शकते, मात्र महिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे अयोग्य असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले.दरम्यान, काँग्रेसने संबंधित शब्दप्रयोग मागे घ्यावा आणि सार्वजनिक जीवनात सन्मानपूर्वक राजकीय संवादाची परंपरा जपावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago