महाराष्ट्र

‘सिद्धिविनायक चोरीप्रकरणी मला माहिती नाही’; बांकीपूर पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. या निकालामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढेल, असा दावा त्यांनी केला. मात्र, सिद्धिविनायक मंदिरातील कथित चोरीप्रकरणी प्रश्न विचारला असता, त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

राऊत म्हणाले, “देशात सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. बांकीपूरचा निकाल हे त्याचं उदाहरण आहे. 1995 पासून जिंकत आलेली जागा भाजपला राखता आली नाही. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी याच मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता, मात्र आता ती जागा भाजप गमावली.”

यावेळी त्यांनी जंतर-मंतरवरील जेन झी आंदोलन, राम मंदिरातील कथित चोरी आणि धार्मिक मुद्द्यांचाही उल्लेख करत भाजपवर टीका केली. “या सर्व घटनांचा मतदारांवर परिणाम झाला आहे. बिहारच्या जनतेच्या डीएनएमध्ये राजकारण आहे,” असे ते म्हणाले.

सिद्धिविनायक मंदिरातील चोरीवर काय म्हणाले?

राम मंदिराप्रमाणेच सिद्धिविनायक मंदिरातील कथित चोरीप्रकरणीही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी या प्रकरणात विशाखा राऊत यांच्या नियुक्त कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला होता. यावर राऊत म्हणाले, “या प्रकरणाची मला माहिती नाही. हा तांत्रिक विषय आहे. मी त्याच्या खोलात गेलेलो नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही.”

‘पोटनिवडणुकीचे निकाल महत्त्वाचे’

राऊत यांनी पोटनिवडणुकींचे राजकीय महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, अशा निकालांमुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांनी अलाहाबाद पोटनिवडणुकीचा दाखला देत, “त्या विजयापासून काँग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली होती. पोटनिवडणुकीचे निकाल पुढील राजकारणाची दिशा ठरवू शकतात,” असे मत व्यक्त केले.

मोहन भागवतांनी आंदोलनातील तरुणांशी संवाद साधावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जेन झी पिढीशी संवाद साधणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “भाजप किंवा संघाच्या नेत्यांच्या मुलांशी नव्हे, तर जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या आणि पोलिस कारवाईला सामोरे गेलेल्या तरुणांशी संवाद साधावा. त्यांच्या भावना समजून घेतल्याशिवाय वास्तव कळणार नाही.”

राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे पोटनिवडणुकीचे निकाल, जेन झी आंदोलन आणि मंदिरांतील कथित चोरीचे मुद्दे पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

16 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago