महाराष्ट्र

कोस्टल रोडवर देशातील पहिला ‘मेलडी रोड’; ‘जय हो’च्या धुनमधून देशभक्तीची भावना जागृत होणार

संगीतमय रस्त्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले उद्घाटन

मुंबई: भारतातील हा पहिलाच संगीतमय रस्ता असून अत्यंत अभिनव अशा या संकल्पनेमुळे मुंबईकरांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होईल. सध्या सुमारे ५०० मीटर अंतरावर तयार करण्यात आलेला हा प्रकल्प पुढे वाढवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोस्टल रोड अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्गावर देशातील पहिल्या ‘मेलडी रोड’चा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २०२६ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्यक्ष प्रवास करून संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला. वाहन चालवत असताना ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू आली, हा वेगळाच आणि आनंददायी अनुभव असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी हंगेरीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून उपस्थित हंगेरीचे काउन्सिल जनरल यांचे त्यांनी अभिनंदन केले. या उपक्रमाची संकल्पना मांडल्याबद्दल खासदार राहुल शेवाळे यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.

मुंबईत आणि कदाचित देशात पहिल्यांदाच असा मेलोडी रोड साकारला गेला असून या उपक्रमामुळे शहराच्या नावात आणखी एक नाविन्यपूर्ण भर पडली आहे. भविष्यातही अशा अभिनव सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत सर्व संबंधितांचे अभिनंदन करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

19 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago