महाराष्ट्र

सोलापूर-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) यंत्रणा अलर्ट झाली असून, महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल्स, खानावळी आणि इतर व्यावसायिक बांधकामांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

चालू वर्षात सोलापूर-पुणे महामार्गावर तब्बल 762 अपघात झाले असून, यामध्ये 426 जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गालगत वाढलेली अतिक्रमणे, रस्त्याच्या कडेला थांबणारी वाहने आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मिळून 60 मीटर अंतर मोकळे ठेवणे बंधनकारक आहे. साधारणपणे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 30 मीटर अंतरात ढाबा, हॉटेल, खानावळ किंवा अन्य व्यावसायिक बांधकाम करता येणार नाही. तसेच या परिसरात वाहने थांबविण्यासही निर्बंध आहेत.

या पार्श्वभूमीवर NHAIने बाळे, मोहोळ, मोहोळ-टेंभुर्णी, सोलापूर-अक्कलकोट आणि सोलापूर-तुळजापूर यासह विविध महामार्गांलगतच्या 100 हून अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित बांधकामे महामार्गाच्या हद्दीत येतात का, याची पाहणी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, पंढरपूर परिसरातील महामार्गांसाठी मोकळ्या जागेचे अंतर 45 मीटर असून, दोन्ही बाजूंना प्रत्येकी 22.5 मीटर अंतरात व्यावसायिक बांधकामांना निर्बंध आहेत. बायपास परिसरातही नियमबाह्य बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.

‘60 मीटर अंतरात व्यावसायिक बांधकाम नको’

सोलापूर NHAIचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी सांगितले की, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील 60 मीटर अंतरात कोणतेही व्यावसायिक बांधकाम नसावे. मात्र, काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे अंतर समान नसून एका बाजूला 25 ते 27 मीटर तर दुसऱ्या बाजूला 33 ते 35 मीटरपर्यंत जागा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमबाह्य बांधकामे असलेल्या व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली जाणार आहे.

संबंधित विभागांची बैठक घेणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महामार्गालगतची सद्य:स्थिती जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर नियमबाह्य बांधकामांवर कोणत्या पद्धतीने कारवाई करायची, याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

त्यामुळे सोलापूर-पुणे महामार्गासह जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांलगत असलेल्या ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांवर आगामी काळात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर बायपासवर बेकायदेशीर रस्ता दुभाजक तोडल्याने चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा बळी

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार…

14 मिनिटे ago

आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर FDAचा हातोडा; 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी…

41 मिनिटे ago

स्वाभिमानीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ ठराव; कर्जमाफीसह शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर…

44 मिनिटे ago

भीमा नदीत वाहून गेलेल्या साहेबराव मुळीक यांचा तीन दिवसांनी मृतदेह सापडला

शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक…

49 मिनिटे ago

संजय राऊत अन् नरेश म्हस्के आमनेसामने; ‘अरे ये ना… यावंच लागणार आहे ना!’ म्हणत राऊतांचा टोला

धनुष्यबाणाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात खडाजंगी; नेमकं काय घडलं? नवी दिल्ली : शिवसेना पक्ष…

1 तास ago

पुणे मार्केट यार्डात डाळिंबाची विक्रमी आवक; १०० टन माल दाखल

पुणे : डाळिंबाचा हंगाम सुरू होताच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची विक्रमी…

2 तास ago