महाराष्ट्र

संजय राऊत अन् नरेश म्हस्के आमनेसामने; ‘अरे ये ना… यावंच लागणार आहे ना!’ म्हणत राऊतांचा टोला

धनुष्यबाणाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात खडाजंगी; नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर मंगळवारी न्यायालयाबाहेर ठाकरे आणि शिंदे गटातील नेते आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर दोन्ही गटांचे नेते माध्यमांशी संवाद साधण्यासाठी न्यायालयाबाहेर आले होते. उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत, तर एकनाथ शिंदे गटाकडून नरेश म्हस्के उपस्थित होते. यावेळी पत्रकार आणि कॅमेऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत यांनी नरेश म्हस्के यांना आमनेसामने चर्चा करण्याचे आव्हान दिले. मात्र, म्हस्के यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर राऊत यांनी त्यांच्यासोबत असलेल्या अनिल देसाई यांना म्हस्के यांना बोलावून आणण्यास सांगितले.

अनिल देसाई म्हस्के यांच्या दिशेने गेले. मात्र, म्हस्के तेथून निघून गेले. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांकडे पाहत, “अरे ये ना, यावंच लागणार आहे ना!” अशा शब्दांत म्हस्के यांना आवाज दिला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर कोणाचा दावा योग्य, याबाबत सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे. मागील दोन-अडीच वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी रखडली होती. आता सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती व्ही. मोहना आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. मागील आठवड्यापासून सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार युक्तिवाद केला जात आहे. त्यामुळे न्यायालयातील सुनावणीसोबतच दोन्ही गटांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही पुन्हा धार आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

9 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

9 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

9 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

9 तास ago