महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या युतीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात ठाकरे बंधू आता कधी एकत्र येतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. रोज नव्याने येणाऱ्या मुद्द्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या पत्रींक्रिया दिल्या आहेत. परंतु, अद्याप दोघेही एकत्र आलेले नाहीत. त्यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज्यात सातत्याने शिवसेना आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागणीला काही प्रमाणात यश आलं. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष, ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरेंनी ५ जुलैच्या मेळाव्यात स्पष्ट केले. मात्र राज ठाकरेंनी यावर काहीही भाष्य केले नाही. तर राज ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत आपली पदाधिकाऱ्यांना याबद्दल काहीही बोलू नये असे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले.

तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी जाहीर होऊ द्या, मग पाहू, असे उद्धव ठाकरेंनी युतीबद्दल म्हंटल आहे.

बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली होती, आता उद्धव ठाकरेंनीही त्यावर भाष्य केलं आहे. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग त्यावर बोलू असेही त्यांनी म्हटले. तर आदित्य ठाकरेंनी, त्यावर, ५ जुलैला आम्ही एकत्र आलो होतो ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. सध्या निवडणुकांचं वातावरण दिसत आहे, जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आमच्या बाजूने आम्ही करु, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही, आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो. बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, आता उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे.

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असा वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहिला आहे.

पण बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले होते?

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असा वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago