महाराष्ट्र

महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते रद्द करता कामा नयेत

पुणे: पुणे शहरांमध्ये नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंत जे गुन्हे घडलेले आहेत त्याबाबत आज पुणे पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या कारवाईबाबत सादरीकरण केले. यावेळी घडलेल्या घटनांवर गांभीर्याने लक्ष देत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचना देत उपायोजना करण्याबाबत सांगितले आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या. तसेच, पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “आज या बैठकीत मी चार-पाच प्रश्न समोर मांडले आणि त्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे पुण्यातल्या वाहतूक कोंडी संदर्भातला आहे. यामध्ये सिग्नलची व्यवस्था, पुणे शहरांमध्ये स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपवण्यात यावी हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे, बऱ्याच वर्षापासून हा प्रयत्न चाललेला आहे. तर तो प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्याकडे मी पाठपुरावा करतो असं गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी सांगितले. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन दंड सहितेनुसार, महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते B Summery केले जातात म्हणजे ते रद्द केले जातात परंतु, दंड संहितेत म्हटलेले आहे की असे कुठलेही गुन्हे रद्द करता कामा नयेत, तर त्याचे पुनर्निरीक्षण करा, अशा मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत.

त्याचबरोबर शहरामध्ये बाराशे-तेराशे पॉक्सोची प्रकरणे आहेत. त्यामधल्या मुलींना प्रत्येक तारखेच्या आधी कळवणे क्रमप्राप्त असते की, त्यांची तारीख आहे आणि त्यांना कोणत्या अडचणी आहेत का? त्या प्रत्येक मुलीला दर महिन्यात त्यांच्या तारखेच्या वेळेला पुणे पोलीस फोन करतात कोणती अडचण असेल तर, गृह भेट देतात. यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुलींची उमेद वाढवण्याच्या दृष्टीने काही साहित्य उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्राच्यावतीने देण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले आणि यासाठी त्यांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

तसेच, पुणे शहराची वस्ती वाढत आहे म्हणून महिला दक्षता समितीच्या ज्या पोलीस स्टेशन पुरत्या मर्यादित आहेत तशा न ठेवता बीट स्तरावरती महिला दक्षता समिती कराव्यात असे सुचवले. पोलीस निधी हा जो उपक्रम आहे तो शाळा, कॉलेजपर्यंत मर्यादित आहे. तर जे बीटचे कॉन्स्टेबल्स आहे ते त्या परिसरामध्ये सातत्याने जातच असतात त्यांनी महिलांची समिती बीट स्तरावरती करावी याला पण पोलीस आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल ते सकारात्मक होते. या खेरीज ड्रग्से प्रमाण कमी झाले पाहिजे, वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अपघातासाठी आणि सायकल प्रेमींसाठी सुरक्षिततेची पावलं उचलली गेली पाहिजेत,” असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुढे ऑनर किलिंग सारख्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “ऑनर किलिंगची एकही घटना पुणे शहरात घडलेली नाही आहे. परंतु, ऑनर किलिंग हे टायटल गुन्ह्यांमध्ये असावं जेणेकरून एखादी जरी ऑनर किलिंगची घटना घडली तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

15 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago