महाराष्ट्र

थोरल्या जाउबाईंच्या निधनाच्या धक्‍याने धाकट्या जावेने सोडला प्राण…

पारगाव (दौंड): पारगावमध्ये थोरल्या जाउबाईंच्या निधनाच्या मानसिक धक्‍याने धाकट्या जावेने प्राण सोडल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पारगाव येथील कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांच्या भाऊजई लता ताकवणे (वय 58) यांचे बुधवारी (ता. 10) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. गेली 30 वर्षांपासून एकत्र कुटुंबातील धाकट्या जाऊचे निधन झाल्याने पोपटराव ताकवणे यांच्या पत्नी रजनी ताकवणे (वय 62) यांना मानसिक धक्‍का बसला. त्यांना त्यातून सावरण्याचा कुटुंबाने अतोनात प्रयत्न केला; परंतु सहा दिवसा नंतर मंगळवारी (ता.16) हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचेही निधन झाले.

रजनी ताकवणे या दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या माजी संचालिका होत्या. त्या उच्चशिक्षित होत्या. समाजात विरहाने निधनाच्या अनेक घटना घडतात; परंतु जावेच्या विरहाने निधन घडण्याची घटना कदाचित पहिलीच असू शकते. संख्या बहिणीं पेक्षा जास्त प्रेम या दोघींचे होते. या दोघी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या या जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

4 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

10 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

10 तास ago