महाराष्ट्र

लाडक्या बहिणींनो जून महिन्याचे 1500 रु. खात्यावर जमा होण्यास सुरुवात

संभाजीनगर: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून 2025 चा हप्ता आजपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून, आता तिचा १२ वा हप्ता लाभार्थी महिलांच्या आधार लिंक खात्यांवर जमा होत आहे.

खात्यावर पैसे आले का? तपासण्यासाठी हे 5 सोपे मार्ग वापरा

SMS तपासा

मोबाईल नंबर बँकेत लिंक असेल तर पैसे जमा झाल्याचा SMS येईल.

ATM वर Mini Statement काढा

जवळच्या ATM वर जाऊन कार्ड टाका आणि Mini Statement बघा.

Mobile App / Net Banking वापरा

बँकेच्या अधिकृत अ‍ॅपवर लॉगिन करा आणि खात्याची माहिती तपासा.

UPI App वापरा (PhonePe, GPay, Paytm)

“Check Balance” ऑप्शन वापरून शिल्लक रक्कम पाहू शकता.

PFMS Website वरून तपासा

https://pfms.nic.in

Know Your Payments” वर क्लिक करा

बँक नाव, खाते क्रमांक व कॅप्चा टाका

DBT द्वारे आलेले पैसे तपासा

महत्वाच

खातं आधारशी लिंक असणं आवश्यक आहे.

मोबाईल नंबर बँकेत नोंदवलेला असावा.

काही वेळा रक्कम 2-3 दिवस उशिराने जमा होऊ शकते.

या महिलांना मिळणार ₹500

“माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

ज्या महिला शेतकरी PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना या दोन्ही योजनांतून 12000 रुपये मिळतात. त्यामुळे सरकारच्या DBT (थेट लाभ हस्तांतरण) धोरणानुसार त्या महिलांना एकूण 18000 रुपये मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वरित 6000 रुपये म्हणजे दरमहा 500 रुपये या महिलांना दिले जातात. अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 7 ते 8 लाख आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago