महाराष्ट्र

आरोग्य सुविधांअभावी मृत्यू हे सरकारला शोभणारे नाही; बाळासाहेब थोरात

मुंबई: इगतपुरीतील एका आदिवासी महिलेला वेळेवर उपचार मिळत नाही, सुविधा मिळत नाही आणि तिचा मृत्यू होतो हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारे नाही, सरकारने या परिस्थितीकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे, असे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

इगतपुरी आणि मोखाडा या आदिवासी दुर्गम बहुल भागात केवळ सुविधा नसल्याने दोन गर्भवती महिला दगावल्या. हा मुद्दा आज विधिमंडळ अधिवेशनात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित करण्यात आला, मात्र सरकारने या विषयावर सभागृहात चर्चा नाकारली.

थोरात म्हणाले, इगतपुरी मध्ये सरकारच्या उदासीन कारभाराचा नमुना बघायला मिळाला. इगतपुरीतील एका महिलेला प्रसूती वेदना असेही झाल्याने तिला इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यामुळे तिला वडीव-हे येथे असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे तिचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर रस्ता नसल्याने तिचा मृतदेह डोलीतून घरी नेण्यात आला महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात, जर आपण आदिवासी भागांमध्ये दुर्गम भागामध्ये, आरोग्य सुविधा देऊ शकत नसेल तर ते आपल्याला शोभणारे नाही.

संपूर्ण दिवसाच्या स्तरावरच आपण महिलांच्या बाबतीमध्ये निष्काळजी असल्याचे दिसतो. आपण जेव्हा स्वतःला प्रगत म्हणून घेतो आणि दुसरीकडे महिलांना साध्या साध्या आरोग्य सुविधा मिळत नसतील तर हे अत्यंत गंभीर आहे. सभागृहात या विषयावर चर्चा व्हायलाच हवी. सरकारने धोरण ठरवायला हवे आणि उपाययोजना करायला हव्यात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago