बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ पोरकं झाले आहे. शीतल या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले.
शितल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसुतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे, मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या. पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व 10 दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी आज सकाळी 10 वाजता पणदरे इथं करण्यात येणार आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…
फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…
शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…
‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…
सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…