महाराष्ट्र

धक्कादायक! पुराच्या पाण्यात स्कुटीसह तरुणी गेली वाहून अन पुढे…

नाशिक: निफाड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. याच पुराच्या एक महाविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली.

अकरावीत शिकणाऱ्या तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

निफाड येथील मुळ रहिवासी असणारी तन्वी विजय गायकवाड (वय १७) हिचे वडील विजय गायकवाड काकासाहेब नगर येथे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करत आहेत. आपल्या वडीलांच्या शाळेत आपण महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे म्हणून ती जवळच असलेल्या शिवडी ता. निफाड येथील बापू क्षीरसागर व शंकर क्षीरसागर येथे मामाकडे राहुन स्कुटीवरुन ये-जा करत महाविद्यालयिन शिक्षण घेत होती.

दोन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याना पुर आला होता. सोमवार (दि. 19) रोजी सकाळी ७ वाजता उगाव- खेडे या दरम्यान असलेल्या पुलावरुन पाणी सुरु होते. पुरपरिस्थितीचे गांभीर्य व पाण्याचा अंदाज न आल्याने तन्वीने आपली बँटरीवरील स्कुटी पाण्यात घातली अन् तिथेच घात झाला.

पुराच्या पाण्यात स्कुटी टाकताच, तन्वी वाहून गेली. परिसरातील नागरिकांनी तिला वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नागरिकांनी तन्वीचा शोध घेतला. तिचा मृतदेह नदीप्रवाहासोबत वाहत जाऊन संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला. निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

17 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

17 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

18 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago