महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत जागावाटपामुळेच पराभव; उद्धव ठाकरे

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी आघाडीने निवडणूक आयोग आणि ‘लाडकी बहीण’ योजनेवर खापर फोडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरु राहिली.त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची कबुली शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

आघाडीवर प्रश्‍नचिन्ह

सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात काही अर्थ नसल्याचे स्पष्ट मत करताना ”लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले तरी उमेदवार होते. विधानसभेला चिन्ह होते, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते. ही चूक होती,” हे ठाकरे यांनी मान्य केले. जागा वाटपाबाबत ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ नसल्याचे सांगत महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘लोकसभेचे यश डोक्यात गेले होते’

महाविकास आघाडीत समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेले होते. लोकसभेच्यावेळी आपल्याला जिंकायचे आहे, हे आपलेपण होते. विधानसभेला मला जिंकायचे हा आपल्यात जो ‘मी’पणा आला त्यामुळे पराभव झाल्याचेही ठाकरे यांनी मान्य केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago