महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, मदतगार, सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. संजय देशमुख यांच्या निधनाने आपली वैयक्तिक आणि सांघिकही खूप मोठी हानी झाली आहे.

सुसंवाद, सौम्यता आणि उत्तम कर्तव्यनिष्ठा हीच त्यांची खरी ओळख होती. शासन आणि जनतेतील दुवा म्हणून त्यांनी आपली भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडली. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.”ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि शोकाकुल कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो,” अशा शब्दांत सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संजय देशमुख यांची मुलगी सध्या जर्मनीत असून, त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या सकाळी ८.३० वाजता वरळीतील दर्शना बिल्डिंग, वरळी पोलिस स्टेशनजवळ, मुंबई येथे होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

48 मिनिटे ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

1 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

2 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

2 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

2 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

4 तास ago