आरोग्य

दातांना ठणक लागण्यामागची कारण

हल्ली आपण बघतो आहोत की बहुतांश लोकांच्या दातांच्या तक्रारी खूप जास्त वाढल्या आहेत. थंड किंवा गरम पदार्थ खाण्यात आले की लगेचच काही लोकांचे दात ठणकतात. त्यांच्यातून अक्षरश: वेदना होतात आणि त्या स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येतात. लहान मुलांनाही हल्ली असाच त्रास बऱ्याच प्रमाणात होत आहे हा त्रास नेमका का होतो, दात सेन्सिटीव्ह होण्यामागची कारणं काय आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतो.

थंड, गरम पदार्थ खाताच दातांना ठणक का लागते

1) आपल्या दातांवर एक चमकदार पांढरट थर असतो. ज्याला आपण टूथ इनॅमल असंही म्हणतो. जर काही कारणांनी दातांवरचे इनॅमल कमी झाले तर दात सेन्सिटीव्ह होऊन त्यांना वारंवार ठणक लागते.

2) दातांची योग्य ती काळजी घेतली नाही तर हिरड्या आणि दात यांच्यामध्ये एक सैलसरपणा येऊ लागतो. हा त्रास शक्यतो वयस्कर व्यक्तींना होतो आणि त्यामुळे दातांना ठणक लागते.

3) काही जण ब्रश करताना खूप हार्ड ब्रिसल्स असणारे टुथब्रश वापरतात. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि जास्त जोर देऊन ब्रश करतात. असं जर वारंवार केलं तर त्यामुळे दातांवरचं इनॅमल कमी होत जातं आणि दात संवेदनशील होतात.

4) काही जण खाण्यापिण्याचे नियम पाळत नाहीत. गरम पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच गार पदार्थ खातात. किंवा थंड पदार्थांनंतर लगेचच गरम पदार्थ खातात. अशा विरुद्ध प्रकृतीच्या पदार्थांचा मारा दातांवर वारंवार झाल्यास दात सेन्सिटीव्ह होतात.

5) दातांचं आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर दात कमजोर आणि संवेदनशील होत जातात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

9 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

10 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

10 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

10 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

10 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

10 तास ago